पहिलं प्रेम

          
        मेघनाला तो प्रचंड आवडायला लागला होता. तिला अनुपची खूप आठवण येत होती. एका वर्षाताच तिला त्याची प्रचंड सवय झाली होती. तिला जुने दिवस आठवत होते, कसा हा अनुप वर बघता बघता शांत वाटला होता आणि नंतर बोलता बोलता कळल कि त्याच्या खोल खोल किती काही दडलं आहे. तो मेघनाचा खुप चांगला मित्र बनला असता जर तिने त्याच्या कडून काही अपेक्षा ठेवल्या नसत्या तर, पण तिलाच कळल नाही मित्र म्हणून आवडणारा तो कधी प्रियकर म्हणून आवडायला लागला. मग न कळत त्याच्याशी ती मनातल खूप काही बोलत. हळूहळू मग त्यालाही कळल कि हिला नक्की काय म्हणायचं. हे तिला समजल्यावर तिन त्याला स्पष्टच सांगितल कि तु मला आवडतो. तिथपर्यंत चालल ही असत अनुपला तिच्याशी बोलण पण मेघनान हट्टच धरला कि त्यानेही तिच्यावर प्रेम कराव, इतर लोक जस फेरता तसंच त्यांनीही फिरावं. मग काय त्याला ते सहन झालच नाही, त्याच्या आयुष्यात असं जबरदस्ती घुसलेल, लादलेलं त्याला कधी पटतच नाही हे तिला माहीतच नव्हत. मग काय अनुपने होती नव्हती ती मैत्री हि हळूहळू तोडून टाकली.तो तिच्याशी रागांच बोलत. त्यामुळे दोघांविषयी कॉलेजमध्ये खूपच चर्चा होत. पण सगळ्यांना काहीच कल्पना नव्हती म्हणून सारेच त्या गोष्टीकडे दुर्लश करत. मग एक दिवस तिने अनुपला त्याच्या खूप जवळच्या मैत्रिणी मिठी मारताना पाहिलं, तिला वाटल नंदिनी हिरावून तर घेत नाहीना ह्याला आपल्या पासुन? ह्याने नंदिनी मूळेच तर ‘नाही’ म्हंटल का आपल्याला? त्या दिवशी प्रश्नाने तिच्या डोक्यात खूप गोंधळ घातला.
         कदाचित त्याने मेघनाला ‘हो’ म्हंटल असत आणि नंतर ‘नाही’ म्हंटल असत तरी तिला ते चाल असत , पण तिला हे सहन होत नव्हत कि सार जग तिच्या समोर नमत होत आणि हा होत नाही? मेघनाला त्याच क्षणाला कोणत्याही परिस्थतीत त्याला मिळवाच होत. Each and every condition… मग काय साऱ्या जगाला ओरडून सांगितल तिने 'अनुपने मला धोका दिला आहे म्हणून’, तिला हे कळत होत कि हे जे काही आपण करतो आहे ते चुकीच करतोय पण तरीही मन मानत नव्हत. मग लोक तिच्याकडे सहानभूतीने पाहत. त्याला खूप अपशब्द बोलत तेव्हा हि तिला खूप वाईटवाटे.तिला वाटे खरी दोषी तर मी आहे .पण खोट बोलणार मन खूपच स्वार होत. मग काय अनुप खूपच दूर जाऊ लागला. मेघमाला माहित होत हा अनुप आता हाती लागणार नाही. तरीही त्याच्या मागे ती पळत सुटली आणि तो आणखीनच तिच्या पासुन दूर जाऊ झाला. 
            जगाशी खोट बोलणारी ती एकांतात स्वतःचा चेहरा आरशात पहात तेव्हा तिला वाटे या असत्याच्या मार्गावर आपण इतको पुढे आलो आहोत की आता मागेही वळूही शकत नाही आणि ह्या मार्गावर ती चालली कोणासाठी तर अनुपसाठी पण तो तर दिवसेनदिवस तिच्यापासून दूर होत होता. आणि मेघना जवळ ची नातीही तिच्यापासून दूरच चालली होती. कारण ती त्याच्याशी स्पष्ट बोलूच शकत नव्ह्ती. तिला सतत जाणवत ती त्याच्याशी खोट बोलत. मग काय न राहून तिने तिच्या जवळच्या एका व्यक्तीला, निरजला खर सांगितल. तिला वाटल हा खूप दूर जाईन पण निरजतर अधिकच जवळ आला. तो म्हणाला "मी तुझ्या जागी असतो तर मीही हेच केल असत. ‘तु त्याला विसरून जा.. एक सांगू मेघना मला तु खरच खूप आवडते , आपण नवीन सुरवात करूयात." तिला वाटल माझात हि काही बात आहे आणि सहजच मिळणारी वस्तू जशी तिला नको होती तसच सहज हाती आलेलं हे नात, तिला हव असणार हे नातसुद्धा तिला नको होत.

टिप्पण्या

  1. पुढे काय केले मेघना ने कथा खुपच छान आहे ह्रदयला स्पर्श करणारी

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद. तुम्ही मला विचारलं 'मेघाचं पुढे काय झालं' कदाचित मी या कथेचा दुसरा भाग नक्कीच लिहिण्याचा प्रयत्न करेल.
      अशीच प्रतिक्रिया देत रहा. धन्यवाद....

      हटवा

टिप्पणी पोस्ट करा