हिवाळा...


              ती आज खूप शांत होती.सकाळ पासून तीच काहीतरी बिनसलं होत. तिच्या डोक्यात सारखे विचार येतं होते. ते टाळत ती काम करत राहिली. पण विचाराना काही बंधन आहे का? ते तर सुसाट धावत येऊन तिला बिलगले, आणि ती परत विचारात गुंतली. हिवाळ्याचा गारठा पसरला होता पण तरीही खिडकी बंद न करता ती खिडकीत जाऊन  बसली, हातातला चहाचा कप बाजूला ठेवला. हिवाळ्यात एक वेगळाच सुगंध येतं असतो, तो सुगंध तिने एका श्वासात पोटात भरण्याचा प्रयत्न केला,पण मन भरल नाही. तिला हा हिवाळा खूपच जवळचा वाटायचा या हिवाळ्याने तिला खूप काही दिल होत . तसंच काही हिरावून ही घेतल होत. ह्या हिवाळ्यात ती प्रेमात पडली होती. ओळखीचाच एक व्यक्ती इतका आवडायला लागला आणि त्याच्यावर प्रेम करता करता ती स्वतःलाच हरवून बसली. हया हिवाळ्याने दुसऱ्यावर प्रेम करायला शिकवलं , दुसऱ्यात गुंतन, हरवणं शिकवलं . तसच स्वतःला विसरणं पण शिकवलं. 
              ती आज हया हिवाळ्यात स्वतःला परत मिळवण्याचा पर्यंत करत होती. बाजूचा चहाचा कप तिने हातात घेतला आणि स्वतःलाच म्हंटली माफ कर यार परत नाही विसरणार, आई शपथ . आता तुझ्या माझ्यात कोणीच नाही येणार, मग स्वतःशीच हसून चहा पुर्ण संपवला .रात्रीचा काळोख पसरला होता आणि आकाश ताऱ्याने भरलं होत, त्यांच्या कडे पहात ती स्वतःला म्हणाली ‘चहा छान झालंय.’

टिप्पण्या

  1. Ajun lihi na yaat ..mhanje story manachya jawal pohochayla lagte n tevdhyat sampte..
    Tu khup chhan lihite ahes ..heart touching..😘🎁

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. धन्यवाद ... मी तुमच्या सल्ल्याप्रमाणे पुढे मी सुधारणा करते.

      हटवा

टिप्पणी पोस्ट करा