कट्टा...

         

             संध्याकाळी सूर्य मावळताना हलकी थंडी जाणवत होती. उन्हाची किरण शरीरला सौम्य वाटत होती. हळूहळू अंधार पडायच्या मार्गावर होता. चहा प्यायल्या वर मी जरा भटकंती करू इच्छित होते. हॉस्टेलमध्ये राहात असल्याने मला माझ्या स्वतः साठी वेळ लागत. गाणी ऐकत वेगवेगळ्या जागेचा मी शोध घेत, जागा मिळाली नाही तर नुसतीच भटकंती.. हाच आपला शौक. अशा वातावरणात मला का कुणास ठाऊक? आकाशला फोन करावासा वाटला.
        मी आकाशला फोन लावला आणि त्यांन कधी नवत पटकन फोन चला. म्हंटल कुठे आहेस? ये चहा घ्यायला. तो म्हणला, कुठे येऊ? मी म्हणलं, आता येऊ नको , झाला आहे चहा घेऊन. तू कुठे आहेस. तो म्हणाला, एका एकदम भरी जागेवर आहे . म्हटलं कुठे, तो म्हणाला तुला माहित नाही. तो सरळ उत्तर देईना. आकाशला काही विचारल तर त्याची सारी उत्तर वेडी वाकडीच असत . मी सुद्धा लोकाच्या दृष्टीने विचित्र असल्याने माझं त्याच्या बरोबर जमत. परत इकडच्या तिकडच्या गप्पा मारून परत एकदा विचारल सांग ना कुठेसं . तो म्हणाला कॅम्पस मधेच आहे तुला ती जागा माहित नाही. विषय सोडून मग त्याच्याशी गप्पा मारता मारता फिरत होते . का कुणास ठाऊक एका ठिकाणे लक्ष गेल तिकडे चालत सुटली. आणि मला एक गाडी दिसली आणि ती गाडी आकाशच्या गाडी सारखीच होती . मी त्याला म्हणलं तुझी गाडी दिसली . मी चालत गेली पण त्याची गाडी नव्हतीच. निराश होऊन मी त्याला म्हंटली, यार नाही आहे तुझी गाडी. मग आकाशी गप्पा मारत मी पुढे चालत गेले. तो अचानक आकाश म्हणाला मला दिसलीस तू. मी म्हंटल, कुठे? तो म्हणाला, मागे वळ. मी वळली पण तो दिसलाच नाही. तो म्हणाला अग डावीकडे.... अग आता उजवीकडे.... मी फिरले तो दिसलाच नाही . मला वाटल माझी हा खचतो आहे. मग तो म्हणाला मागे वळ मी वळलीच नाही.आणि म्हंटली वळले. तो म्हणाला, तू वळली नाहीस मला तू दिसतेस . 
        मग मी वळली तो खरच दिसला; एका झाडा खाली. मी त्या देशेने गेली तर झाडाच्या आलीकडे एक कट्टा होता. मागे घर पण तरीही शांतता आम्ही गप्पा मारल्या तो घरी जाण्यासाठी निघाला, मला म्हणाला चल सोडतो तुला. मी म्हंटल मी बसते. तो म्हणला, मी जातो. थांबाण्यातला तो नव्हता आणि तो गेला तर मी एकटी आहे म्हणून मागे वळून येणाऱ्या मधला पण तो नव्हता. मग तिथे थोड्यावेळ बसली छान वाटलं 
               मग सवयच लागली त्या जागेवर जायची. कधी जगा पासुन दूर पळण्यासाठी ...कधी प्रश्न्याच्या गुंत्यात स्वतःला वेढलेल पाहून गुंता सोडवण्यासाठी तेथे जात, घरापासून खूप दूर होते पण स्वतःच्या जवळ येत चाले होते. या जागेने खूप काही शिकवलं. जेव्हा गरज असतेना तेव्हा कोणी येत नसत तेव्हा स्वतःला स्वतःच सांभाळायचं असत .. जगाशी स्वतःच लढायचं असत .. एवढ्या लोकाच्या गर्दीत हरवल्यावर स्वतःलाच स्वतःने शोधाव लागत .. या जागेनेच शिकवलं नवीन जागेला स्विकारण .. कधी कोणाला न घाबरता, माघार न घेण. 

टिप्पण्या