विचित्र हे मन ...

 


 

 



             मन विचित्र असत. हे सावरता येत नाही . हे मन इतक चंचल वाऱ्याप्रमाणे, इतकं हळव पाण्याप्रमाणे, इतकं तिव्र अग्नीप्रमाणे, इतकं विस्तृत आकाशाप्रमाणे, इतकं मायाळु धरतीप्रमाणे. जस चांगलं तस वाईट ही.
           आपल्यातच मन असत. मनातच आपण. मनाला सावरणं अवघडच पण प्रयत्न तर करा. त्याला सांगा नको इतका वाहू की तु थकशील अन् तु थकल्यामुळे तुला लोक अडवतील. नको इतका हळवा होऊ की इतर त्याचा फायदा घेतील. नको इतका विस्तृत होऊ की कि नंतर तुलाच रडू येईन. नको इतका मायाळु होऊ की नंतर तुला कुणाची गरज असेन तेव्हा कुणीही तुझी काळजी घ्याला नसेन  म्हणुन मना ऐक जरा माझं.  हे विचित्र मना आपल्या भावनांना दे जरा लगाम.

      




 


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा