तुला शोधताना

नियतीने तुला माझ्यासाठी शोधलं
पहिल्यांदा पाहिलं तुला वाटलं कोण आहे?
मग नियतीनं  की कोण काय माहीत, 
तूच मला  शोधलं...  
अनोळखी तू अनोळखी मी , 
अचानकच ओळखीचो झालो...
मैत्री सजली , क्षण सजले.
उन्हाळा आला, पावसाळा झाला...
हिवाळ्यात  मात्र कडाक्याच्या थंडीत
तुजी आठवण देखील कडकडली... 
रोज तुला शोधायांची....
तू आला नाही की कसकस वाटायचं
तू दिसला की असंअसं वाटायचं...
पण तुला शोधताना, 
मला ही शोधायला लागले मी...  
तुला शोधण्याचं  कारण काय याच्या शोधात...
मग अचानकच  शोध लागला...  
तुला मी सारखी का शोध राहते याचा....
आई ग.. हाच का उठठेवी शोध.... 
नाही नाही हे कसं होऊ शकतं... 
नाही नाही हे शक्यचं नाही...
तुला शोधण्याचं कारण शोधत होते
आता मलाच कोण शोधणार... 
तुला शोधताना मला कळलं. 
मला... मला तू आवडतोस..
तुला शोधलं रे ... पण ... 
स्वतःला तुझ्यात हरवलं त्याच काय.....

टिप्पण्या