लाचार बाप



मुलांच्या भांडणात बापाला
लाचार होताना पाहिलयं मी,
घरावर हुक्कुम चालवण्याला
स्वताः हुक्कुम पाळताना पहिलय मी.
दुसऱ्यांचे नक्राश्रु ओळखुनही,
चांगल वागताना पहिलय मी.
एका बापाला लाचार होताना पाहिलयं मी.
स्वताच्या कष्टाने सार उभ करून,
मूलाचं ऐकताना पाहिलय मी.
एका रूपयापासून हजार रूपये झाले,
पण हातात काहीच नाही असही पाहिलय मी.
एका बापाला लाचार होताना पाहिलय मी

टिप्पण्या