सोनेरी पहाट

आज पसरलंय संकटांच काहूर,
भीतीच आहे नुसती सर्वत्र.
अस्तित्वाची जाण नसण्यारेना,
अचानक अस्तित्वाची जाण येऊ लागली.
गोष्टी वर छोट्या छोट्या भांडणारे लोक, 
एकत्र येऊ लागली.
दुरून का होईना काहीतरी सांगू लागली.
त्यातही  आहेत अजून काही,
स्वार्थ बघून घेता काहीबाही.
संकटाशी काही घरबसून लढता आहे,
अतिहूशार त्यांतच काही;
बाहेर जाऊन मरता आहे.
गरीबलोक तर उपाशीपोटी घरीच जगता आहे,
उद्याची भाकर खायची कशी? हाच मोठा प्रश्न आहे.
तरीही ते लढता आहेत,
अंधाराला सरता आहेत.
सारेच पाहत आहे वाट,
लवकरच होईल  सोनेरी पहाट.

टिप्पण्या