ती आणि तिचा आरसा


       


          स्वतःला आरशात निरखून पाहत ती उभी होती. तिला आठवल कोणी म्हंटल होत की, जास्त वेळ आरशासमोर आपण आपल्या डोळ्यात-डोळे घालून पाहू शकत नाही, असाह्य होत आपल्याला.
           तिने हे ऐकल्यावर तस करून पाहिलं. पण तिला तर मज्जा वाटली. कारण साऱ्या जगाशी  खोट बोलणारी ती स्वतःशी नेहमीच खर बोलत. म्हणूनच ती स्वतःला तासतास आरशात पाहत असे, स्वतःला प्रश्नात गुंतलेल पाहून, स्वतःकडून     आज हि एक मोठा प्रश्न होता. तिला पहिला मुलगा येणार होता. ती तयार नव्ह्तीच. पण घरच्या समोर नाईलाज म्हणून भेटूया तरी म्हणून ती तयार झाली. नाव, गाव काहीही न विचारता! कधी येणार विचारल तर  घरचे म्हणाले होते ”येत्या रविवारी “. OK, THEN भेटूया.असं म्हणून ती आरश्यासमोर जाऊन ती उभी राहिली. आपण ठीक केल ना? स्वतःला प्रश्न विचारला, आणि उत्तर आल , “ठीकच केलं, OPTION होत का?” उतर मिळाल आणि ती शांतपणे झोपून सुद्धा गेली.
          रविवारचा दिवस उजाडला. स्वतःला निरखून पाहत, वेगळ्याच तंद्रीत ती आरश्या समोर उभी होती.मुलगा आलाय असा आवाज आला आणि तिची तंद्ररी तुटली.
           पोहे,चहाचा ट्रें घेऊन तिने हॉल मध्ये प्रवेश केला. उत्साह नव्हताच.पोहे ठेवले, समोर न पाहताच खुर्चीत बसली. HELLOW असा समोरून आवाज आला. स्वतःच्या नकळत तिने त्या मुलाकडे पाहिलं. त्या मुलाकडे पाहिलं आणि तिला जुने दिवस आठवले. 
      कॉलेजमध्ये असताना तिला हाच मुलगा आवडलेला होता. पण तिने कधी बोलण्याची हिमतच केली नाही आणि तिथूनच सवय लागली होती आरशा समोर उभ राहून स्वतःशी खर बोलण्याची. हे आठवून छोटास स्मित तिच्या चेहऱ्यावर आलं. घरच्याने एकमेकांशी बोलायला निवांत वेळ दिला .तिला खूप काही बोलायचं होत. पण तोच बोलत सुटला.” मी तुझ्याच कॉलेजमध्ये होतो. खर सांगू मला तु तेव्हाच आवडायची, पण म्हंटल शिक्षण संपवु, छान नोकरी करावी मग विचारूया.पण हिंमतच झाली नाही.मग आईला सांगितलं आणि तुझ्या घरी फोन केला. आणि आज इकडे आलो.”
          तिने फक्त मान हलवली . तिला खुप काही बोलायच होत पण ती फक्त हसली. त्याच्याकडे पाहिलं आणि एका क्षणात ती उठून आरशासमोर गेली आणि हसता हसता तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागल. ती स्वतःशीच म्हणाली  हेच का ते आनंदआश्रु?  

टिप्पण्या