मी जिवंत आहे का?


कोणी मागे निदा केली तरी काही वाटत नाही.
कोणी समोर अपमान केला तरी काही जाणवतं नाही.
कोणी तुसंक बोल तरी काही भासत नाही,
कोणी कीतीही मन तोडलं तरी काही रुतत नाही.
कोणी प्रेमाने बोले तरी आपलंस वाटत नाही.
कोणी रागाने पाहिलं तरी गाजत नाही...   
प्रश्नाचं काहूर कधी माजत नाही 
सूंदर  विचार आता सजत नाही...
मी बोथट झाली आहे... 
मला दया नाही की माया नाही... 
राग नाही कि अपमान नाही..
अपेक्षा नाही की दुःख नाही .... 
मी जिवंत आहे का?
मी जिवंत आहे का?


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा