कॉलेजचे दिवस



कॉलेजचा असा होता पहिला दिवस... 
युद्धावर घाबरत घाबरतच चाललो होतो.
मग काय अनोळखी लोक भेटली,
आणि मग अचानकच मैत्री सजली.
मनातलं न घाबरता सांगू लागलो.
विश्वास ठेवून तेही ऐकू लागले.
आपण काय काय करू शकतो, 
याचा आम्हाला लागला नवीनच शोध.
मग काय आमचाच घ्यावा जगाने बोध.
अभ्यास बरोबर मग जम बसला छंदाचा.
चुकत, पडत, आदळत,आपटत
नवीन काही करू लागलो.
मित्रांबरोबर मज्जाही करू लागलो.
कॉलेज नंतर कॅन्टींग होतच.
नास्ता साठी उत्तम दुकान होतीच.
लायब्ररीत जाऊ अभ्यासा बरोबर ,
गॉसिप सुद्धा चालू होतं.
सतत लेक्चर बंक मारणारा तो,
पहिल्या प्रेमात लेक्चर अटेंड करू लागला.
शॉपिंग न करणारी ती, 
अचानकच शॉपिंग करू लागली.
परीक्षेच्या वेळेसच प्रोजेक्ट,
असाईनमेंट भरु लागलो. 
परीक्षेच्या आदल्या दिवशी,
नाइट मारून अभ्यास ही चालू होताच.
सगळं कसं बर चाललं होतं..
मग हळूहळू दिवस भरले,
क्षणाचे थर सजू लागले.
मैत्री जास्तच मन रमली,
छंदांची आता स्वप्न होऊ लागली.
मग हळूहळू दिवस मोजू लागलो,
मनातच दुःखाने थिजू लागलो. 
सेंड ऑफ पार्टी झाली.
प्रत्येकाच्या नवनवीन  दिशांवर,
 ते भरभरून उडू लागले.
आज कित्येक वर्षे झाली,
 पण आठवणी अजूनही ताजा आहे....

टिप्पण्या